
भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी येथील महाराष्ट्र मंडळाच्या सभागृहामध्ये ‘शौर्यजागृती शिबिरा’चे आयोजन करण्यात आले होते. भाग्यनगरमधील अनेक महिला-युवतींनी या शिबिरात उत्साहाने सहभाग घेतला. या शिबिराचा उद्देश आणि कार्यपरिचय समितीचे राज्य समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी सांगितला. या वेळी सौ. विनुता शेट्टी यांनी ‘हिंदु धर्माचे महत्त्व आणि भारताचा गौरवशाली इतिहास’, यांविषयी, तर सौ. संध्या परमेश्वरन् यांनी ‘महिलांची सद्यःस्थिती अन् त्यांनी करावयाची पूर्वसिद्धता’, यांविषयी मार्गदर्शन केले. या वेळी महिलांना स्वसंरक्षणाच्या विविध पद्धती शिकवण्यात आल्या. ‘प्रत्येक आठवड्याला प्रशिक्षणवर्ग घ्या’, अशी मागणी अनेक युवतींनी या वेळी केली.
मोशी (पिंपरी-चिंचवड) येथे ‘अक्सा बेकरी’त धर्मांधांचा हिंदूंच्या आरोग्याशी खेळ !
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !