गुजरातमध्ये विनाअनुदानित शाळांनी केलेल्या विरोधामुळे नवरात्रोत्सवाची ८ दिवसांची सुट्टी रहित !

गुजरातमधील भाजप सरकारने नवरात्रोत्सवासाठी घोषित केलेली ८ दिवसांची सुट्टी विनाअनुदानित शाळंनी केलेल्या विरोधामुळे रहित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी सरकारने सुट्टी देण्याचा निर्णय घेतला होता.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे श्री कालीमातेच्या मूर्ती नर्मदा नदीत विसर्जित करण्यास पोलिसांचा विरोध

येथील ग्वारीघाट भागात श्री कालीमातेच्या मूर्तीचे नर्मदा नदीत विसर्जन करण्यास पोलिसांनी विरोध केल्याने भाविक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करत भाविकांवर थेट लाठीमार चालू केला.

जळगाव येथे हिंदु युवकाची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यासाठी मोर्चा

नवरात्रीच्या काळात शहरातील तांबापुरा भागातील शामा फायर चौकात धर्मांधांनी दगडफेक केली होती. त्या काळात या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसलेले हिंदु युवक नीलेश सपकाळ तेथून जात असतांना त्यांना मागून दगड लागला…..

अमरावती येथे ‘पटेलनगर नवरात्री रासगरबा महोत्सव’ या मंडळाकडून चित्रपटगीतांवर गरब्याचे आयोजन करण्याचा अश्‍लाघ्य प्रकार !

अमरावती येथील ‘पटेलनगर नवरात्री रासगरबा महोत्सव’ या मंडळाकडून नवरात्रोत्सवात चित्रपटगीतांवर गरब्याचे आयोजन करण्यात आले होते.

गोंडा (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांकडून श्री दुर्गामूर्तीच्या मिरवणुकीवर दगडफेक

येथील कटारा बाजार येथे धर्मांधांकडून श्री दुर्गादेवीच्या मूर्तीविसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत जिल्हाधिकारी, पोलीस यांच्यासह अनेक भाविक घायाळ झाले.

पुणे येथील अष्टमीची पूजा कथित प्राणीप्रेमी कार्यकर्त्यांनी उधळली !

नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी एरंडवणे भागातील एखंडे कुटुंबियांकडून पूजा आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी बोकडाचा बळी दिला जाणार होता. त्याला आक्षेप घेत प्राणी हक्क कार्यकर्त्यांनी एखंडे कुटुंबियांच्या घरात घुसून ही पूजा उधळली.

भोपाळ येथे रावण दहनाच्या कार्यक्रमात विदेशी तरुणींच्या नृत्याचे आयोजन !

कोलार भागातील बंजारी दसरा मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या रावणदहनाच्या कार्यक्रमाच्या वेळी विदेशी तरुणींच्या अश्‍लील नृत्याचे आयोजन करण्यात आल्याचे समोर आले आहे.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शस्त्रपूजा ही परंपरेनुसार चालत आलेली पद्धत ! – सुधीर पाठक

संघाची शस्त्रपूजा ही परंपरेनुसार चालत आली असून संघ त्या परंपरेचे पालन करत आहे, असे मत जेष्ठ संघ विचारक सुधीर पाठक यांनी येथे १७ ऑक्टोबरला व्यक्त केले. भारिप बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शस्त्रपूजेला विरोध …..

चोपडा येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विजयादशमीनिमित्त सामूहिक शस्त्रपूजन !

येथे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर सामूहिक शस्त्रपूजन करण्यात आले.

गोंडा (उत्तरप्रदेश) में धर्मांधों ने श्री दुर्गादेवी की मूर्तिविसर्जन जुलूस पर पथराव किया ! 

भाजपा के राज्य में धर्मांधों की उद्दामता जानो !


Multi Language |Offline reading | PDF