गणपतीपुळे तीर्थक्षेत्राचे सुशोभीकरण होणार !

निधीमुळे मंदिराचे सुशोभीकरण,वाहनतळ,भक्तनिवास, पर्यटकांची सुरक्षितता  तीर्थक्षेत्रांकडे जाणारे रस्ते, पथदीप, मंदिर परिसर, पिण्याचे पाणी, प्रसाधनगृहे आदी सोयी उपलब्ध होणार आहेत.

सिंधुदुर्ग : सरमळे येथील श्री देव सपतनाथ मंदिराचा जीर्णाेद्धार एका रात्रीत पूर्ण !

श्री सातेरी आणि श्री भगवती देवतांनी दिलेला कौल अन् श्री सपतनाथदेवाचा आशीर्वाद घेऊन ५ मार्च या दिवशी सूर्यास्तानंतर मंदिराच्या जीर्णाेद्धाराच्या सेवेला प्रारंभ करण्यात आला आणि ६ मार्च या दिवशी पहाटे कलशारोहण करून या सोहळ्याची सांगता झाली.

बांगलादेशी घुसखोरांना देशातून कधी हाकलणार ?

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात अनधिकृतपणे प्रवेश केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी २ बांगलादेशी नागरिकांना कह्यात घेतले असून यांत एक जण मुसलमान आहे. मंदिराच्या नियमांनुसार येथे केवळ हिंदूच प्रवेश करू शकतात.

शिवमंदिर परिसराचा विकास झाल्यानंतर लोक ‘चलो अंबरनाथ’ही म्हणतील ! – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अंबरनाथ हे वाढते शहर आहे. वाढत्या शहराची आवश्यकता लक्षात घेऊन आपण विकासाला कुठेही पैसे अल्प पडू देणार नाही. शिव मंदिर परिसर सुशोभीकरण प्रकल्प काशी विश्वनाथ मंदिराच्या धर्तीवर विकसित केला जात आहे.

पुरी (ओडिशा) जगन्नाथ मंदिरात घुसलेल्या २ बांगलादेशी नागरिकांना पकडले !

बांगलादेशी नागरिकांना देशातून हाकलून न लावल्याचा परिणाम ! त्यांना बाहेर काढण्याविषयी कोणतेही सरकार प्रयत्न करत नाही, हे लक्षात घ्या !

Abu Dhabi’s BAPS Mandir : अबुधाबीतील स्वामीनारायण मंदिरात पहिल्या रविवारी तब्बल ६५ सहस्र लोकांनी घेतले दर्शन !

अबुधाबी येथे गेल्याच महिन्यात उद्घाटन झालेले स्वामीनारायण मंदिर १ मार्च या दिवशी सर्वांसाठी खुले करण्यात आले. हे मंदिर सर्वांसाठी उघडल्यानंतर पहिल्या रविवारी, म्हणजे ३ मार्चला तब्बल ६५ सहस्र लोकांनी मंदिरात भावपूर्ण दर्शन घेतले.

काशी विश्‍वनाथ मंदिराच्या २ कि.मी. परिघात मांस आणि दारू यांची दुकाने चालूच !

महापालिकेच्या कारवाईचा फज्जा ! वाराणसी (उत्तरप्रदेश) – काशी विश्‍वनाथ मंदिराच्या २ किलोमीटर परिघात मांस आणि दारू यांच्या विक्रीवर बंदी घालण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतली होती; मात्र ही मोहीम कागदावरच राहिल्याचे समोर आले आहे. महापालिका क्षेत्रात येणार्‍या बेनियाबाग, नैसडक आणि दालमंडी या ठिकाणी साधारण १०० हून अधिक मांसविक्री करणार्‍या करणार्‍या दुकानांनी समोर हिरवा पडदा लावून त्याच्या … Read more

सांस्कृतिक निर्वसाहतीकरणाचे प्रतीक म्हणजे अबु धाबी येथील हिंदु मंदिर !

अबु धाबीमध्ये हिंदु मंदिर उभारले जाणे, म्हणजे भारताच्या ‘वसुधैव कुटुम्बकम्’ या भारतीय मूल्याची विश्वात जोपासना करणे होय !

मंदिरांमुळे उद्योगधंदे आणि लोककला यांचा झालेला विकास !

मंदिराच्या आध्यात्मिक लाभासह अन्य अनेक लाभ मोठ्या प्रमाणात भारतीय समाज अनेक पिढ्या अनुभवत आहे. याविषयी या लेखातून अवगत करण्याचा हा प्रयत्न ! यातून मंदिरांनी त्या त्या प्रदेशात अस्तित्वाने कसे कार्य केले आहे ? याची माहिती मिळते.

तेलंगाणामध्ये खोदकामाच्या वेळी सापडली १ सहस्र ३०० वर्षांपूर्वीची २ मंदिरे !

तेलंगाणाच्या कृष्णा नदी किनारी वसलेल्या मुदिमानिक्यम गावात पुरातत्व विभागाचे शास्त्रज्ञ भूमीचे खोदकाम करत असतांना त्यांना दगड तुटण्याचा आवाज आला. जेव्हा त्यांनी माती बाजूला करून पाहिले, तेव्हा तिथे दुर्मिळ शिलालेखासह बादामी चालुक्य काळातील २ मंदिरे सापडली.