तिरुमला मंदिरात अंडी बिर्याणी खातांना लोकांना पकडले !

तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील तिरुमला मंदिरात काही लोकांना अंडी बिर्याणी खातांना पकडण्यात आले. अलिपिरी चेकनाक्यावरील सुरक्षेत झालेल्या त्रुटींविषयी विविध विरोधी पक्षांनी ‘तिरुमला तिरुपती देवस्थानम्’वर (‘टीटीडी’वर) टीका केली आहे. तिरुमलामध्ये दारू, मांसाहार, सिगारेट ओढणे आणि तंबाखू चघळणे यांवर कडक बंदी आहे; परंतु भाविकांचा एक गट अंडी बिर्याणी खातांना पकडला गेल्याने गोंधळ उडाला.

तिरुमला पोलिसांनी पकडलेल्या लोकांना सांगितले की, तिरुमलामध्ये दारू, मांसाहार, सिगारेट ओढणे आणि तंबाखू चघळणे यांवर कडक बंदी आहे, तेव्हा भाविकांनी सांगितले की, त्यांना याविषयी काहीही माहिती नाही. तिरुमला पोलिसांनी त्यांना कडक चेतावणी देऊन सोडून दिले.

संपादकीय भूमिका

केवळ तिरुमला मंदिरच नव्हे, तर हिंदूंच्या कुठलेही मंदिर आणि त्याचा परिसर येथे मांसाहार करायचा नसतो, हे या कथित भाविकांना ठाऊक नाही का ? मंदिराचे पावित्र्य भंग करणार्‍या अशा कथित भाविकांना शिक्षा होणे आवश्यक !