Gautam Adani At Mahakumbh : उद्योगपती गौतम अदानी यांची कुंभक्षेत्री भेट

कुंभक्षेत्री सेवा करताना उद्योगपती गौतम अदानी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – अदानी उद्योगसमूहाचे सर्वेसर्वा तथा अब्जाधीश गौतम अदानी यांनी कुंभक्षेत्री भेट दिली. त्यांनी पवित्र त्रिवेणी संगमाच्या ठिकाणी जाऊन पूजन आणि प्रार्थना केली. यानंतर त्यांनी येथील प्रसिद्ध श्री बडे हनुमान मंदिरात जाऊन पूजन केले. ‘इस्कॉन’च्या तंबूत जाऊन त्यांनी भाविकांना प्रसादाचे वाटप केले. या प्रसंगी त्यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी प्रीती अदानी उपस्थित होत्या.

कुंभपर्वाचे व्यवस्थापन हा व्यवस्थापन संस्थांसाठी संशोधनाचा विषय ! – अदानी

या वेळी अदानी म्हणाले, ‘‘प्रयागराज महाकुंभाचा माझा अनुभव संस्मरणीय होता. येथील व्यवस्थापन हा व्यवस्थापन संस्थांसाठी संशोधनाचा विषय आहे. गंगामातेच्या आशीर्वादाच्या व्यतिरिक्त काहीही उत्तम नाही.’’