Siddhatek Illegal Tomb Demolished : सिद्धटेक येथील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील अनधिकृत थडगे उद्ध्वस्त !

सकल हिंदु समाजाची कारवाई !

(थडगे (मजार) म्हणजे मुसलमानाचे प्रेत पुरलेली जागा)

अहिल्यानगर : हिंदूंची मंदिरे जिथे असतात, तिथे जिहादी प्रवृत्ती अनधिकृत अतिक्रमण करतात. असे अनधिकृत अतिक्रमण (थडगे) जिथे असेल, तिथे बजरंगबलीचे मंदिर उभारले जाईल. वक्फ बोर्डाच्या चुकीच्या कायद्यामुळे वक्फ बोर्डाने अनेक हिंदु मंदिरावर चुकीच्या पद्धतीने दावा प्रविष्ट केला आहे.

अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील अनधिकृतरित्या बांधलेले थडगे हटवल्यानंतर जल्लोष करतांना आमदार संग्राम जगताप आणि इतर कार्यकर्ते

जिथे पीर आहे, ती नवनाथांची ठाणी आहेत; पण दर्ग्याच्या नावाखाली नवनाथांची ठाणी बळकवली गेली आहे. तिथे हिंदु धर्म पद्धतीने पूजन करण्यात यावे. हिंदु समाजाने जागृत होणे आवश्यक आहे, असे आवाहन आमदार संग्राम जगताप यांनी केले.

कर्जत जवळील सिद्धटेक येथील अष्टविनायकांपैकी एक असणार्‍या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रवेशद्वारासमोरील अनधिकृतरित्या बांधलेले थडगे सकल हिंदु समाजाने हटवले. नंतर सिद्धिविनायकाची महाआरती करण्यात आली. या वेळी ते बोलत होते. या वेळी हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सागर बेग आणि सकल हिंदु समाजाचे कार्यकर्ते उपस्थित मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

  • जे काम प्रशासनाने करायल हवे ते हिंदूंना करावे लागते, हे प्रशासनाला लज्जास्पद ! सरकार प्रशासनातील संबंधित निष्क्रीय अधिकार्‍यांवर कारवाई केली पाहिजे !
  • आतापर्यंत गड-दुर्गांवर अवैध थडगी उभारण्यार्‍या धर्मांधांचे लक्ष आता मंदिरांवरही आहे. निद्रिस्त हिंदूंनी आतातरी जागरूक होऊन धर्मांधांचे षड्यंत्र मोडून काढावे !
  • थडगे म्हणजे मुसलमानाचे प्रेत पुरलेली जागा असतांना कोणताही प्रेत पुरलेले नसतांना त्या प्रकारचा ढांचा उभारून त्याला थडगे म्हणाणारे याद्वारे ‘मजार जिहाद’ करत आहेत, हे लक्षात घ्या !