श्रीलंकेच्या नौदलाकडून २५ भारतीय मासेमार्‍यांना अटक !

श्रीलंकेकडून सातत्याने भारतीय मासेमार्‍यांना अटक केली जात असतांना भारत सरकारने आतापर्यंत अशा घटना रोखण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक होते ! असे का होत नाही ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उपस्थित होतो !

जानेवारी २०२४ मध्ये चीनची आणखी एक हेरगिरी करणारी नौका श्रीलंकेत येणार !

भारताचा विरोध असतांनाही श्रीलंका चीनच्या नौकांना अनुमती देतो, यावरून चीनच्या तुलनेत भारताच्या दबावाचा परिणाम श्रीलंकेवर होत नाही, असेच चित्र आहे.

श्रीलंकेतील भारतीय मासेमारांच्या सुटकेसाठी तमिळनाडू मुख्यमंत्र्यांचे परराष्ट्रमंत्र्यांना पत्र

मुख्यमंत्री स्टॅलिन म्हणाले की, श्रीलंकेच्या नौदलाने भारतीय मासेमारांना ओलीस ठेवल्याच्या आणि त्यांच्या नौका जप्त केल्याच्या घटना वारंवार घडत आहेत.

पाकिस्तानी मुसलमान खेळाडू मला नेहमीच धर्मांतरासाठी दबाव टाकत होते !

पाकिस्तानचे हिंदु धर्मीय माजी क्रिकेट खेळाडू दानिश कनेरिया यांचा गंभीर आरोप !

तब्बल ४० वर्षांनंतर भारत-श्रीलंका यांच्यातील फेरी (नौका) सेवेस प्रारंभ !

भारत-श्रीलंका संबंधांना अधिक सशक्त करण्यासाठीचे महत्त्वपूर्ण पाऊल ! – पंतप्रधान मोदी

भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेकडून चीनच्या गुप्तहेर नौकेला तिच्या बंदरावर येण्यास अनुमती !

भारत ज्या देशांना साहाय्य करतो, त्यांतील बहुतेक देश भारताचा विश्‍वासघात करतात, असेच दिसून येते. यावरून भारताने कुणाला साहाय्य करण्यापूर्वी विचार करणे आवश्यक आहे !

चीन श्रीलंकेमध्ये गरिबांना १९ सहस्र घरे बांधून देणार !

चीन सातत्याने श्रीलंकेला कोणत्या ना कोणत्या कारणाद्वारे स्वतःच्या नियंत्रणात घेण्याचा किंवा त्याचा भारताच्या विरोधात वापर करण्याचा प्रयत्न करत आहे. चीनच्या या डावपेचाला भारताने तितकेच रोखठोक प्रत्युत्तर देणे आवश्यक आहे !

निराधार आरोप करण्याची कॅनडाच्या पंतप्रधानांना सवय ! – अली सॅब्री, परराष्ट्रमंत्री, श्रीलंका

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या प्रकरणी भारताचा हात असल्याच्या केलेल्या आरोपावर आता श्रीलंकेने भारताच्या बाजू घेतली आहे.

श्रीलंकेकडून पुन्हा एकदा चीनच्या हेरगिरी करणार्‍या नौकेला बंदरावर थांबवण्याची अनुमती !

आर्थिक दिवाळखोर झालेल्या श्रीलंकेला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून कर्ज मिळण्यासाठी चीनने नाही, तर भारताने साहाय्य केले होते. त्यानंतर श्रीलंका पुन्हा उभा रहात आहे; मात्र याची परतफेड श्रीलंका जर अशा प्रकारे करत असेल, तर भारताने याचा विचार करण्याची आवश्यकता आहे !

चीनची हेरगिरी करणारी दुसरी नौका श्रीलंकेत येणार !

श्रीलंकेला दिवाळखोरीत सर्व प्रकारचे साहाय्य करणार्‍या भारताचा विरोध डावलून श्रीलंका चीनला अशा प्रकारे साहाय्य करतच रहाणार असेल, तर भारताने त्याला साहाय्य करण्याविषयी विचार करण्याची आवश्यकता आहे !