Sri Lanka To Release Pakistani Prisoners : श्रीलंका ४३ पाकिस्तानी कैद्यांना मुक्त करणार !

 उभय देशांत सामंजस्य करार !

मोहसिन नकवी व रवींद्रचंद्र गुणरत्ने

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेतील कारागृहांमध्ये शिक्षा भोगत असलेल्या ४३ पाकिस्तानी बंदीवानांना श्रीलंका सरकार मुक्त करणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये यासंदर्भात सामंजस्य करार झाला आहे. यानुसार दोन्ही देश एकमेकांच्या कारागृहांत शिक्षा भोगत असलेल्या बंदीवानांची सुटका करतील.

‘डॉन’ या पाकिस्तानच्या वृत्तपत्राने या संदर्भातील वृत्त प्रसिद्ध केले आहे. यानुसार पाकचे गृहमंत्री मोहसिन नकवी यांनी श्रीलंकेचे उच्चायुक्त अ‍ॅडमिरल (सेवानिवृत्त) रवींद्र चंद्र श्रीविजय गुणरत्ने यांच्याशी नुुकतीच चर्चा केली केली.


नुकतेच श्रीलंकेतील एका न्यायालयाने अमली पदार्थांची तस्करी करणार्‍या पाकच्या १० नागरिकांना शिक्षा सुनावली आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने त्यांना पकडून सर्व पुरावे न्यायालयासमोर सादर केले.