माझ्या चुकांमुळे देश आर्थिक संकटात ! – गोटाबाया राजपक्षे, राष्ट्रपती, श्रीलंका
गोटाबाया राजपक्षे म्हणाले की, वर्ष २०२० मध्ये रासायनिक खतांच्या वापरावर घातलेल्या बंदीसाठी मला खेद आहे. या निर्णयामुळे देशातील धान्याचे उत्पादन पुष्कळ अल्प झाले. यामुळे नागरिकांकडून आंदोलने करण्यात आली. माझा हा निर्णय चुकीचा होता.