Sacred water from Sarayu River : श्रीलंकेतील सीतामाता मंदिरात अयोध्येतील शरयू नदीच्या जलाद्वारे अभिषेक !

कोलंबो – श्रीलंकेतील नुवारा एलिया या मध्यवर्ती प्रांतातील सीतामाता मंदिरात अयोध्येतील शरयू नदीच्या पवित्र जलाद्वारे अभिषेक करण्यात आला. मंदिराच्या या जीर्णोद्धाराच्या कार्यक्रमात ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर, श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त श्री. संतोष झा यांच्यासह भारत, नेपाळ आणि श्रीलंका येथील सहस्रो भाविक उपस्थित होते.

शरयू नदीचे पवित्र जल रथयात्रेद्वारे कोलंबो येथील मयूरापती श्री बद्रकालीमाता मंदिरातून सीतामाता मंदिरापर्यंत नेण्यात आले. श्रीलंकेतील भारताचे उच्चायुक्त श्री. संतोष झा यांच्या हस्ते या रथयात्रेला विधिवत् प्रारंभ करण्यात आला. सीतामाता मंदिर हे रामायणातील अशोक वाटिकेचे स्थान असल्याचे सांगण्यात येते.