कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने अटक केलेल्या १९ भारतीय मासेमारांची सुटका करण्यात आली आहे. श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी पोस्ट करून ही माहिती दिली.
श्रीलंकेच्या नौदलाने गेल्या महिन्याच्या उत्तरार्धात एका निवेदनात मान्य केले होते की, त्याने वर्ष २०२४ मध्ये श्रीलंकेच्या समुद्री सीमेमध्ये मासेमारी करण्यासाठी आलेले २३ भारतीय ट्रॉलर (मोठ्या नौका) आणि १७८ भारतीय मासेमार यांना पकडले होते.
संपादकीय भूमिकाश्रीलंकेकडून भारतीय मासेमारांना अटक होऊ नये, यासाठी भारताने मासेमारांना भारतीय समुद्री सीमा कुठपर्यंत आहे, हे लक्षात येण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे ! |