श्रीलंका सरकार रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार !

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंका सरकार श्रीलंकेतील रामायण काळातील ५२ ठिकाणे विकसित करणार आहे. ‘रामायण ट्रेल’ नावाने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. अयोध्येतील श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरि महाराज आणि न्यासाचे पदाधिकारी यांनी नुकतेच ‘रामायण ट्रेल’ प्रकल्पाचे उद्घाटन केले.

या वेळी त्यांच्यासमवेत श्रीलंकेच्या संसदेचे अध्यक्ष महिंदा यापा अबेवर्धने, क्रिकेटपटू सनथ जयसूर्या, श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्त संतोष झा, तसेच अनेक खासदार आणि श्रीलंका सरकारचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सौजन्य Newsfirst English 

स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी हनुमान जयंतीच्या दिवशी श्रीलंकेतील कँडी शहराजवळील डोंगराळ भागात असलेल्या रामबोध हनुमान मंदिरात विशेष पूजा केली. या मंदिरात श्री हनुमानांची १८ फूट उंच मूर्ती आहे.