प्रयागराज कुंभपर्व २०२५

प्रयागराज, १ फेब्रुवारी (वार्ता.) – प्रयागराज कुंभक्षेत्री १ फेब्रुवारी या दिवशी श्रीमद् जगद्गुरु रामानंदाचार्य स्वामी राजेश्वरमाऊली सरकार यांच्या श्री रुक्मिणी विदर्भ पीठाच्या वतीने झालेल्या श्रीकृष्णजन्मभूमी मुक्ती तथा मंदिर निर्माण महासंवाद कार्यक्रमात जगद्गुरु शंकराचार्य, अनेक संत-महंत, महामंडलेश्वर यांनी श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीसाठी संघटित होऊन लढा देण्याचा निर्धार व्यक्त केला. श्रीकृष्णजन्मभूमी मुक्तीच्या न्यायालयीन लढ्याला सर्व संत-महंत, महामंडलेश्वर यांनी पाठिंबा असल्याचे घोषित केले, तसेच या लढ्याला विरोध करणार्या निधर्मीवाद्यांना त्यांच्याच भाषेत ‘जशास तसे’ उत्तर देण्याचा संकल्पही या कार्यक्रमात करण्यात आला. सर्व भाविकांनी जात-पात विसरून या लढ्यात सहभागी होऊन हा लढा यशस्वी करण्याचे आवाहन सर्व संत-महंत महामंडलेश्वर यांनी केले.