पोशाख हिंदु कारागिरांनीच बनवण्याची हिंदु नेते दिनेश शर्मा फलाहारी यांची मागणी

मथुरा (उत्तरप्रदेश) – वृंदावनमधील प्रसिद्ध ठाकूर बांके बिहारी (भगवान श्रीकृष्ण) परिधान करत असलेला पोशाख मुसलमान बनवत आहेत. याविरुद्ध आता हिंदूंनी आवाज उठवला आहे. ठाकूर बांके बिहारींचा पोशाख हिंदूंनीच बनवावा, अशी मागणी मथुरा श्रीकृष्णजन्मभूमी प्रकरणातील याचिकाकर्ते आणि हिंदु नेते दिनेश शर्मा फलाहारी यांनी प्रसारमाध्यमांशी बोलतांना केली.
Who should make the attire of Banke Bihari (Shri Krishna)
Mu$l!m artisans are crafting Shri Krishna’s attire in Vrindavan!
🛕 Hindu leader Dinesh Sharma Falahari demands that only Hindu artisans should be allowed to do this sacred work!
❓ Shouldn’t only devotees make the… pic.twitter.com/OAiki4zsle
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 13, 2025
१. दिनेश शर्मा म्हणाले की, मंदिर व्यवस्थापनाने भगवान श्रीकृष्णाला मुसलमानांनी बनवलेले कपडे घालायला लावू नये.
२. दिनेश शर्मा यांनी वृंदावनच्या ठाकूर बांके बिहारी मंदिराचे पुजारी आणि सेवेकरी यांची भेट घेतली आणि त्यांना एक निवेदन दिले. त्यांनी मंदिर व्यवस्थापनाला भगवान श्रीकृष्णासाठी हिंदु कारागिरांनी बनवलेले कपडे आणि रंग वापरण्याची विनंती केली आहे.
३. दिनेश शर्मा म्हणाले की, मुसलमान लोक गायींची हत्या करतात आणि हिंदु धर्माविरुद्ध काम करतात. आपण अशा लोकांकडून ठाकूरजींच्या (भगवान श्रीकृष्णाच्या) सजावटीच्या वस्तू खरेदी करणे योग्य नाही.
४. मथुरेतील वृंदावनमध्ये सहस्रो मुसलमान कुटुंबे ठाकूरजींचे कपडे आणि दागिने बनवण्याचे काम करतात. वृंदावनातील मुसलमान समुदायाने सिद्ध केलेले कपडे देशभरात, तसेच परदेशात मोठ्या प्रमाणात विकले जातात.
संपादकीय भूमिकामनात हिंदु देवतांविषयी श्रद्धा असलेल्यांनीच देवतांचा पोशाख बनवावा. मुसलमानांच्या मनात भगवान श्रीकृष्णाविषयी जरा तरी श्रद्धा आहे का ? आणि ती असेल, तर ते श्रीकृष्णजन्मभूमीमुक्तीसाठी प्रयत्न करत आहेत का ? |