एक मासात इस्लामी अतिक्रमणे हटवून दोषी अधिकार्‍यांवर कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडणार !

  • ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’ची चेतावणी

  • कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगडावरील ‘रेहानबाबा’ दर्ग्याला शासकीय खिरापत, तर मंदिरे अन् बाजीप्रभु यांचे स्मारक यांकडे शासनाचा कानाडोळा !

  • जे ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’च्या लक्षात येते, ते पुरातत्व खाते आणि प्रशासन यांच्या लक्षात का येत नाही ? गडावर ६४ अतिक्रमणे होईपर्यंत प्रशासन झोपा काढत होते का ? अशी इस्लामी अतिक्रमणे पुरातत्व खाते आणि प्रशासन यांच्या लक्षात न येणे, हे त्यांना लज्जास्पद ! अशा अतिक्रमणांची प्रशासनाने स्वतःहून नोंद घेऊन ती हटवणे अपेक्षित आहे !
  • एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या संबंधितांवर सरकारने कठोर कारवाई करावी, ही शिवप्रेमी आणि हिंदुत्वनिष्ठ यांची अपेक्षा !

कोल्हापूर, १६ मार्च (वार्ता.) – पुरातत्व खाते आणि जिल्हा प्रशासन यांनी अक्षम्य दुर्लक्ष केल्यामुळे जिल्ह्यातील शाहुवाडी तालुक्यातील विशाळगडावर ६४ हून अधिक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर इस्लामी अतिक्रमणे झाली आहेत. गडावरील प्राचीन मंदिरांची पडझड झाली असून मूर्ती भग्नावस्थेत आहेत. शूरवीर बाजीप्रभु देशपांडे आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांसारख्या राष्ट्रपुरुषांच्या समाधींकडे अत्यंत अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याउलट गडावर रेहानबाबा दर्ग्याकडे जाणारे रस्ते आणि परिसर यांचे सुशोभीकरण करण्यासाठी शासनाकडून लाखो रुपये निधी उपलब्ध होत आहे. तेथे जाण्यासाठी ‘पेव्हर ब्लॉक’चा रस्ता आहे, तर दर्ग्याचे आर्.सी.सी. बांधकाम झाले आहे. ‘रेहानबाबा’ दर्ग्याच्या परिसरातील सुधारणांसाठी शासकीय खिरापत वाटण्यात आली आहे, तर मंदिरे अन् बाजीप्रभु यांच्या स्मारकांकडे शासन कानाडोळा करत आहे. इतिहासकारांच्या मते स्वराज्यावर आक्रमण करण्यासाठी आलेला रेहान नावाचा सरदार होता. तेथील हिंदूंच्या स्मारकाच्या शेजारी असलेल्या झर्‍यातील पाणी त्या बाबांचे ‘तीर्थ’ म्हणून दिले जात आहे. त्यामुळे याद्वारे छत्रपती शिवरायांच्या इतिहासाचे इस्लामीकरण करण्याचा घाट घातला जात आहे. हे इस्लामी षड्यंत्र आम्ही कदापि सहन करणार नाही. विशाळगडावरील इस्लामी अतिक्रमणे हा छत्रपती शिवरायांचाच अवमान आहे. ‘ही अतिक्रमणे प्रशासनाने येत्या १ मासात त्वरित न हटवल्यास या विरोधात राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल’, अशी चेतावणी ‘विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समिती’चे प्रवक्ते श्री. सुनील घनवट आणि कृती समितीचे सदस्य श्री. बाबासाहेब भोपळे यांनी दिली. ते येथे १६ मार्च या दिवशी घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

डावीकडून श्री. चारुदत्त पोतदार, श्री. रमेश पडवळ, श्री. बाबासाहेब भोपळे, बोलतांना श्री. सुनील घनवट, श्री. किशोर घाटगे, श्री. प्रमोद सावंत, श्री. सुरेश यादव, श्री. संभाजीराव भोकरे, अधिवक्ता समीर पटवर्धन आणि श्री. किरण दुसे

उपस्थित मान्यवर…

या वेळी कृती समितीचे सदस्य श्री. संभाजीराव भोकरे (शिवसेना उपजिल्हाप्रमुख), मलकापूर येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. चारुदत्त पोतदार आणि श्री. रमेश पडवळ, शिवसेनेचे श्री. किशोर घाटगे, कृती समितीचे समन्वयक श्री. किरण दुसे, हिंदु विधीज्ञ परिषदेचे सदस्य आणि कृती समितीचे कायदेविषयक सल्लगार अधिवक्ता समीर पटवर्धन, श्री महालक्ष्मी भक्त समितीचे श्री. प्रमोद सावंत, शिरोली येथील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे जिल्हा कार्यवाह श्री. सुरेश यादव (उपसरपंच शिवसेना).

विशेष

या पत्रकार परिषदेचे ‘फेसबूक लाईव्ह’ करण्यात आले. ते १० सहस्रांहून अधिक जणांनी पाहिले.