वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव : सनातन धर्माची वैचारिक सुरक्षा आणि हिंदु राष्ट्र स्थापनेचे वैधमार्गाने प्रयत्न यांवर केंद्रीभूत !

मंदिरमुक्ती अभियान, हा हिंदु राष्ट्राचा पाया आहे !  केवळ अयोध्येतील राममंदिरच नाही, तर काशी-मथुरा-भोजशाळा यांसारख्या सर्वच इस्लामी अतिक्रमणग्रस्त मंदिरांच्या मुक्तीसाठी हे अधिवेशन कटीबद्ध असेल.

काशी विश्वेश्वर मंदिराच्या मुक्तीसाठी कायदेशीर लढा देणार्‍या धर्मप्रेमींचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गौरव !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचा गौरव केला. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी ‘बाबा विश्वनाथकी जय’, ‘नम: पार्वतीपते हर हर महादेव’ या घोषणा दिल्या.

वैश्‍विक हिंदु राष्‍ट्र महोत्सव – द्वितीय दिवस (२५ जून) : अनुभवकथन आणि उपासनेचे महत्त्व

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या आशीर्वादाने हिंदु राष्ट्राची स्थापना करू ! – आचार्य चंद्र किशोर पराशर, संस्थापक, आंतरराष्ट्रीय सनातन हिंदु वाहिनी, बिहार

राज्‍यघटना आणि देश यांविरोधी शक्‍तींना रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र आवश्‍यक ! – रमेश शिंदे, हिंदु जनजागृती समिती

ज्‍यांना भारताची राज्‍यघटना, सार्वभौमता आणि कायदेच मान्‍य नाहीत, असे लोक संसदेत जाऊ लागले, तर निश्‍चितच भविष्‍यात या राज्‍यघटनेला धोका निर्माण होऊ शकतो. त्‍यामुळेच राज्‍यघटना आणि देश यांविरोधी शक्‍तींना रोखण्‍यासाठी हिंदु राष्‍ट्र आवश्‍यक आहे.

अनेक शारीरिक कष्ट होत असतांनाही तळमळीने हिंदुत्वाचे कार्य करणारे वाराणसी व्यापार मंडळाचे अध्यक्ष श्री. अजित सिंह बग्गा ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

त्यांच्या मनात ‘हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी’, अशी सात्त्विक अपेक्षा आहे. ‘मी हिंदुत्वासाठी किती करू ?’, असा विचार त्यांच्या मनात सतत असतो. त्यामुळे त्यांना ईश्वरी शक्ती सहजतेने ग्रहण होत असते.

वाराणसी येथे ‘अखिल भारतीय सनातन न्यासा’च्या वतीने आयोजित रामकथेमध्ये हिंदु जनजागृती समितीचा सहभाग

अखिल भारतीय सनातन न्यासाच्या वतीने रामकथेचा प्रारंभ हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ, काशीविश्वनाथ मंदिर प्रभागाचे अध्यक्ष प्रा. नागेंद्र पांडेय आणि अन्य संतवृंदांच्या वतीने दीपप्रज्वलनाने करण्यात आला.

तणावमुक्त जीवनासाठी व्यक्तीमत्त्वातील दोष दूर करणे आवश्यक ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

‘नॉर्दर्न कोलफिल्ड लिमिटेड’चे तांत्रिक संचालक जितेंद्र मलिक यांनी वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन आश्रमातील अत्यंत शांतता अनुभवली होती. या प्रकारचा लाभ त्यांच्या कर्मचार्‍यांनाही मिळायला हवा. या उद्देशाने त्यांनी हा संपूर्ण कार्यक्रम आयोजित केला होता.

‘स्कूल ऑफ मॅनेजमेंट सायन्सेस’चे प्राध्यापक डॉ. संजय सक्सेना अन् ‘काशी विश्व हिंदु विद्यापिठा’च्या प्राध्यापिका डॉ. पौर्णिमा सक्सेना यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !

‘आश्रमामध्ये पुष्कळ सकारात्मक आणि दैवी ऊर्जा आहे. तसेच येथे रहाणारे साधक धन्य आहेत’, असे उद्गार सक्सेना दांपत्याने या वेळी काढले.

कुलदेवतेच्या नामस्मरणामुळे प्रारब्ध सुसह्य होते ! – सद्गुरु नीलेश सिंगबाळ, हिंदु जनजागृती समिती

कलियुगात नामस्मरण हीच साधना आहे. नामजपाला कोणत्याही प्रकारचे बंधन नाही. त्यामुळे भवसागर पार करून देणार्‍या आपल्या कुलदेवतेचे नामस्मरण आपण अधिकाधिक केले पाहिजे

जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म -‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण चतुर्वेदी यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट !

श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.