वाराणसी (उत्तरप्रदेश) – हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी साधना करणे सर्वांनी आवश्यक आहे. सनातन संस्थेच्या आश्रमात सर्वांकडून साधना करवून घेण्याकडे विशेष महत्त्व दिले जाते, हे कौतुकास्पद आहे. आश्रमात पुष्कळ सात्त्विक वातावरण आणि सकारात्मक ऊर्जा आहे, असे उद्गार जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅॅटफॉर्म – ‘प्राच्यम’चे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) श्री. प्रवीण चतुर्वेदी यांनी काढले. श्री. चतुर्वेदी हे त्यांच्या कुटुंबियांसह ८ मे या दिवशी येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट देण्यास आले होते. त्या वेळी त्यांनी वरील उद्गार काढले. या वेळी त्यांच्या समवेत त्यांच्या पत्नी सौ. रेवती चतुर्वेदी आणि मुलगी कु. प्रांजली चतुर्वेदी उपस्थित होत्या.
जगातील पहिल्या ‘हिंदु ओटीटी प्लॅटफॉर्म – ‘@prachyam7' चे मुख्य कार्यकारी अधिकारी @captain_praveen यांची वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील सनातन संस्थेच्या आश्रमास भेट !
वाचा :https://t.co/37B0Ni7sFC
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ (@Nilesh_C13)… pic.twitter.com/xH75PC0Ud0
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) May 13, 2024
या वेळी हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी चतुर्वेदी कुटुंबियांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या राष्ट्र-धर्म कार्याविषयी विविधांगी माहिती दिली.