गोवा : वाराणसी (उत्तरप्रदेश) येथील काशी विश्वेश्वर मंदिर मुक्तीसाठी कायदेशीर लढा देणार्या धर्मप्रेमींचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गौरव करण्यात आला.
मागील ४० वर्षे यासाठी संघर्ष करणारे श्री. सोहन लाल आर्य, कायदेशीर लढा देणारे अधिवक्ता सुभाष नंदन चतुर्वेदी, अधिवक्ता मदन मोहन यादव, अधिवक्ता दीपक कुमार सिंग, यांसह माता शृंगारगौरीच्या पूजेच्या अधिकारासाठी याचिका करणार्या सौ. सीता साहू आणि त्यांना पाठींबा देणारे त्यांचे यजमान श्री. बाल गोपाल साहू, याचिकाकर्त्या सौ. मंजू व्यास या सर्वांचा वैश्विक हिदु राष्ट्र अधिवेशनात सत्कार करण्यात आला. सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचा गौरव केला. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी ‘बाबा विश्वनाथकी जय’, ‘नम: पार्वतीपते हर हर महादेव’ या घोषणा दिल्या.
Dharmapremis fighting the legal battle for the liberation of the Kashi Vishwanath Temple honoured at the Vaishvik Hindu Rashtra Mahotsav !
Sou Manju Vyas, Sou Seeta Sahu, Shri Bal Gopal Sahu, Shri Sohan Lal Arya, Adv Subash Nandan Chaturvedi, Adv Madan Mohan Yadav, Adv Deepak… pic.twitter.com/n3RfUfTFim
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 26, 2024