
बीड – परळीजवळ एका टिप्परने दुचाकीस्वार सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांना धडक दिल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील केज तालुक्यामधील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची काही दिवसांपूर्वीच निर्घृण हत्या करण्यात आली होती.
अभिमन्यू क्षीरसागर हे सौंदाना गावाचे सरपंच आहेत. सरपंच अभिमान क्षीरसागर हे परळीवरून ११ जानेवारीच्या रात्री काम आटोपून दुचाकीने गावाकडे निघाले होते. मिरवट येथे त्यांच्या दुचाकीला टिप्परने धडक दिली. या वेळी जोरात धडक बसल्याने क्षीरसागर रस्त्याच्या कडेला पडले. या भीषण अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात एवढा भीषण होता की, क्षीरसागर यांच्या दुचाकीचा चक्काचूर झाला.