शिक्रापूर-चाकण मार्गावर मद्यधुंद धर्मांध कंटेनरचालकाची २० कि.मी.पर्यंत पोलिसांसह अनेक वाहनांना धडक !

जमाव पाठलाग करत असल्‍याचे पाहून धर्मांध चालकाने कंटेनर दामटला !

पुणे – चाकण-शिक्रापूर रस्‍त्‍यावर १६ जानेवारी या दिवशी दुपारी कंटेनरने ३ महिलांना धडक दिली. अपघातानंतर कंटेनरचालक पळून जात आहे, असे दिसल्‍याने अनेक दुचाकी आणि खासगी वाहनांनी कंटेनरचा पाठलाग केला. कंटेनरला थांबवण्‍याचा प्रयत्न करणार्‍या आणि समोरून येणार्‍या १५ ते २० खासगी वाहनांना कंटेनरने धडक देऊन पुष्‍कळ हानी केली. या धडकेत पोलिसांच्‍या वाहनाचाही समावेश आहे. स्‍थानिक नागरिक आणि रस्‍त्‍यावरील लोक यांनी कंटेनर थांबवण्‍यासाठी दगडफेक केली; मात्र कंटेनर न थांबता पुढे जातच होता. बहुळ गावानजीक पोलिसांनी आडवे लावलेले बॅरिकेड्‌स उडवून कंटेनर पुढे गेला. जातेगाव फाटा (ता. शिरूर) येथे हायवा गाडीचालकाने कंटेनरला रस्‍त्‍याच्‍या खाली ढकलले, त्‍याच वेळी कंटेनर बंद पडल्‍याने थांबला. कंटेनरचा पाठलाग करणार्‍या जमावाने कंटेनरचालकाला बेदम मारहाण केली. अकीब अब्‍दुल रजाक खान या मद्यधुंद कंटेनरचालकाला पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

पोलीस वाहनामधील साहाय्‍यक पोलीस निरीक्षक नकुल न्‍यामने, साहाय्‍यक पोलीस उपनिरीक्षक रोहिदास मोरमारे आणि वॉर्डन अभिजित कदम हे किरकोळ घायाळ झाले. गेल्‍या वर्षी पुणे येथे मोठ्या प्रमाणात ‘हिट अँड रन’चे प्रकारही घडले होते, तर पुण्‍याकडे येणार्‍या महामार्गावरही अनेक अपघात झाले आहेत. यावर उपाययोजना करण्‍याची मागणी होत आहे.

संपादकीय भूमिका :

मद्य पिऊन कंटेनरसारखे मोठे वाहन चालवणारा धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहे. धर्मांधांना जनतेच्‍या जिवाचे भय नाही, हे दर्शवणारे उदाहरण !