Tirumala Venkateswara Temple : तिरुपती मंदिराच्या लाडू वितरण केंद्राला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग !

तिरुपती (आंध्रप्रदेश) – येथील तिरुपती मंदिरातील लाडू वितरण केंद्राजवळ १३ जानेवारीच्या रात्री आग लागली. प्रसाद घेण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असतांना ही आग लागली. यात कुणीही घायाळ झाले नाही.

शॉर्ट सर्किट झाल्यामुळे ही आग लागली. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवले.