महिलांवरील अत्याचारात वाढ !
वसई – वसई, विरार, मीरा-भाईंदर शहरात महिलांवरील अत्याचारात वर्ष २०२३ च्या तुलनेत वाढ झाली आहे. वर्ष २०२४ मध्ये बलात्काराचे गुन्हे ४७ ने, तर विनयभंगाचे गुन्हे ७७ ने वाढले आहेत. सामूहिक बलात्कारांतही वाढ झाली आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून, फसवणूक करून, धमकावून, अश्लील छायाचित्रांच्या आधारे फसवून बलात्कार करण्यात आले.
३ गुन्हेगार भाऊ तडीपार !
कल्याण – येथे पोलीस ठाण्याच्या अभिलेखावरील मोठे गुन्हेगार आकाश अभिमान गवळी (वय ३३ वर्षे), शाम अभिमान गवळी (वय ३४ वर्षे) आणि नवनाथ अभिमान गवळी (वय २८ वर्षे) या तीन भावांना ठाणे, मुंबई आणि रायगड जिल्ह्यांतून तडीपार करण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. त्यांच्यावर जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, गंभीर दुखापती करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे असे गुन्हे नोंद आहेत. लोक या तिघांना प्रचंड घाबरत होते.
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात
नाशिक – पुणे-नाशिक महामार्गावर नारायणगावजवळ सकाळी १० वाजता झालेल्या भीषण अपघातात ९ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३ जण घायाळ आहेत. प्रवासी वाहतूक करणार्या ‘मॅक्स ऑटो’ गाडीला मागून ‘आयशर’ टेंपोने जोरदार धडक दिल्याने मॅक्स ऑटो अक्षरशः चेंडूप्रमाणे फेकली गेली. ४ महिला, ४ पुरुष आणि १ बाळ यांचा मृतांत समावेश आहे.
पुणे येथे अमली पदार्थ विकतांना धर्मांधाला अटक !
पुणे – येरवडा परिसरात अहमद वाहिद खान हा अमली पदार्थांची विक्री करत होता. त्याच्याकडून २३ लाख रुपयांचे ११० ग्रॅम ‘मॅफेड्रॉन’ जप्त केले. ‘पुणे अमली पदार्थ मुक्त’ या मोहिमेअंतर्गत अमली पदार्थ विक्रेत्यांवर लक्ष ठेवण्यात येत आहे. गुन्हे शाखेतील अमली पदार्थ विरोधी पथक कारवाई करत आहे.
जनावरांची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला
कसारा – जनावरांची अवैध वाहतूक करून पशूवधगृहाकडे घेऊन जाणारा टेंपो ट्रक कसारा पोलिसांनी १७ जानेवारीला पहाटे पकडला. हॉटेल सेवाय या ठिकाणी हा ट्रक उभा होता. संशय आल्याने पोलीस ट्रकची महिती घेण्यास गेले असता त्यामध्ये बैल आढळून आले. पोलिसांनी चालकाला कह्यात घेतले.
संपादकीय भूमिका : गोवंशियांच्या हत्या थांबण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !