पोलिसांवर आक्रमण करणार्यांना सोडणार नाही ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर येथे घडलेली दंगल सुनियोजित होती; येथे एक ट्रॉली भरून दगड सापडले आहेत. काही लोकांनी घरांवर दगड जमा करून ठेवले होते. मोठ्या प्रमाणात शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. वाहनांची जाळपोळ झाली. काही ठराविक घरांना, तसेच आस्थापनांना लक्ष्य करण्यात आले.