Vishnu Shankar Jain Assassination Plot : प्रखर धर्माभिमानी अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हत्येचा कट उघड

  • संभल येथील कथित मशिदीच्या सर्वेक्षणाच्या वेळी करण्यात येणार होती हत्या

  • आरोपी गुलाम याने चौकशीत दिली माहिती

प्रखर धर्माभिमानी अधिवक्ता विष्णु शंकर जैन

संभल (उत्तरप्रदेश)- येथील श्री हरिहर मंदिराच्या ठिकाणी असलेल्या शाही जामा मशिदीच्या सर्वेक्षणावरून झालेल्या हिंसाचारातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. या हिंसाचाराचा मुख्य सूत्रधार शारिक साटा याचा खास साथीदार गुलाम याला पोलिसांनी अटक केली आहे. गुलामकडून ३ पिस्तूल, परदेशी आणि स्वदेशी काडतुसे आणि एक मॅगझिन जप्त करण्यात आले. त्याच्या चौकशीतून या प्रकरणातील हिंदु पक्षाचे अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हत्येचा कट रचण्यात आल्याचेही उघड झाले आहे.

१. गुलाम याने चौकशीत मान्य केले की, त्याच्यावर शारिक साटा याने अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांच्या हत्येचे दायित्व सोपवले होते. संभल पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी गुलामविरुद्ध २० हून अधिक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याची अटक मोठे यश मानले जात आहे.

२. संभलचे पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिश्नोई म्हणाले की, शारिक साटा भारतातून पळून गेल्यानंतर गुलाम शस्त्रांच्या बदल्यात वाहने चोरून ईशान्येकडील राज्यांमध्ये विकायचा. शारिक साटा याने त्याला ‘जामा मशिदीचे सर्वेक्षण करू देऊ नका आणि सर्वेक्षणापूर्वी विष्णुशंकर जैन यांना ठार मारा’, असा आदेश दिला होता. २४ नोव्हेंबर २०२४ या दिवशी गुलामच्या टोळीतील गुंडांनी पोलिसांवर अंदाधुंद गोळीबार केला, ज्यामध्ये ५ मुसलमान ठार झाले. गुलाम एका ॲप आणि त्याच्या पत्नीच्या मोबाईल क्रमांक यांचा वापर करून शारिक साटाशी बोलत असे.

संपादकीय भूमिका 

हिंदूंच्या नेत्यांना, तसेच त्यांच्या बाजूने लढणार्‍यांना वेचून वेचून ठार मारण्याचा धर्मांधांचा नेहमीच प्रयत्न होत आला आहे. ही स्थिती रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राला पर्याय नाही !