Violence By Muslims In Holi : होळीच्या दिवशी देशात अनेक ठिकाणी धर्मांध मुसलमानांनी केला हिंसाचार !

उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर येथील हिंसाचार

नवी देहली – होळी दहन आणि धुळवड या दिवशी देशातील विविध राज्यांत धर्मांध मुसलमानांकडून हिंसाचार करण्यात आला. पंजाब, उत्तरप्रदेश, गुजरात, महाराष्ट्र आदी राज्यांत हा हिंसाचार झाला.

उत्तरप्रदेश

१. उत्तरप्रदेशातील शाहजहांपूर येथे जगप्रसिद्ध लाट साहेबांच्या मिरवणुकीत पोलिसांवर बूट आणि चप्पल फेकण्यात आल्या. त्यांच्यावर विटा आणि दगडही फेकण्यात आले. जेव्हा पोलिसांनी हे करण्यापासून रोखले, तेव्हा अधिक प्रमाणात दगडफेक करण्यात आली. त्यामुळे पोलिसांना स्वसंरक्षणार्थ लाठीमार करावा लागला.

२. उन्नावमध्ये होळी मिरवणुकीच्या वेळी पोलिसांवर दगडफेक करण्यात आली, ज्यामध्ये ३ पोलीस घायाळ झाले. मथुरा येथे रंग लावण्यावरून झालेल्या वादात १० जण घायाळ झाले.

३. उन्नाव जिल्ह्यातील गंजमुरादाबाद शहरात होळीच्या मिरवणुकीच्या वेळी मद्यधुंद गुंडांनी गोंधळ घातला. पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्यांच्यावर दगडफेक केली. दगडफेकीत ३ पोलीस घायाळ झाले. गुंडांना नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला.

४. मथुरेतील बाटी गावात रंग लावण्यावरून धर्मांध मुसलमानांनी दगडफेक झाली. या घटनेत १० जण घायाळ झाले. पोलिसांनी ७ आरोपींना कह्यात घेतले.

५. जेवरच्या रणहेरा गावात होळीच्या दिवशी दंगल झाली. येथे किरकोळ वाद झाल्यानंतर धर्मांध मुसलमानांकडून हाणामारी करण्यात आली. या वेळी दगडफेकीसह गोळीबार करण्यात आला. यामध्ये ५ जण घायाळ झाले.

६. बिजनौरच्या धामपूरमध्ये रंग लावण्यावरून धर्मांध मुसलमानांनी मारहाण केली.

७. मुरादाबादच्या वीर शाह हजारी भागात होळीच्या दिवशी मिठी मारण्यास नकार दिल्याने एका युवकाने भाजप नेत्यावर गोळी झाडली. या घटनेत २ जण घायाळ झाले.

८. बागपतमधील राठोडा गावात होळी खेळण्यावरून वाद झाला. ज्यामध्ये धर्मांध मुसलमानांनी घरात घुसून तरुणाला गोळ्या घालून ठार मारले.

हिमाचल प्रदेश

माजी आमदार बंबर ठाकूर (वर्तुळात) यांची गोळ्या घालून हत्या

होळीच्या दिवशी हिमाचल प्रदेशातील बिलासपूरमध्ये काँग्रेसचे माजी आमदार बंबर ठाकूर यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. त्यांच्यावर ४ अज्ञात व्यक्तींनी गोळ्या झाडल्या. बंबर ठाकूर होळी खेळत असतांना आरोपी तिथे आला आणि त्याने त्यांच्यावर १२ गोळ्या झाडल्या.

झारखंड

घोडथंबा येथील हिंसाचार

झारखंडमधील गिरिडीह जिल्ह्यातील घोडथंबा येथे होळीच्या मिरवणुकीच्या वेळी धर्मांध मुसलमानांनी हिंसाचार केला. त्यांनी अनेक दुकानांना आग लावली. या हाणामारीत अनेक जण घायाळ झाले. परिसरातील तणाव लक्षात घेता अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • हिंदूंचा असा एक ही सण नाही, ज्या दिवशी धर्मांध मुसलमान हिंदूंवर आक्रमण करत नाहीत, हे हिंदूंना आणि त्यांनी निवडून दिलेल्या सरकारांना लज्जास्पद !
  • ही स्थिती पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे, हे लक्षात घेऊन हिंदूंनी कृतीशील होणे आवश्यक आहे !