देहलीतील हिंदुविरोधी दंगलीचे प्रकरण
नवी देहली – देहलीतील हिंदुविरोधी दंगलीतील दिलबर नेगी हत्या प्रकरणातील आरोपी महंमद शाहनवाझ याची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. या प्रकरणात यापूर्वी १२ आरोपींची निर्दोष मुक्तता झाली होती.
देहलीतील हिंदुविरोधी हिंसाचाराच्या वेळी आरोपी महंमद शाहनवाझ याने दंगलखोर मुसलमानांच्या जमावासह एका गोदामाला आग लावली होती. या आगीत जळून खाक झालेल्या गोदामात दिलबर नेगीचा मृतदेह २६ फेब्रुवारी २०२० या दिवशी कुजलेल्या अवस्थेत सापडला होता.
सुनावणीच्या वेळी अतिरिक्त सत्र न्यायाधीश पुलस्त्य प्रामचला यांनी निर्णय देतांना सांगितले की, फिर्यादी पक्ष त्याचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला. दंगलखोर जमावातील सदस्य म्हणून शाहनवाझची ओळख पटवणे साक्षीदारांना शक्य झाले नाही अथवा त्यांच्या साक्ष्य अस्पष्ट होत्या.