(अजान म्हणजे मुसलमानांना मोठ्या आवाजात नमाजासाठी आमंत्रित करणे)

कर्णावती (गुजरात) : अजान देण्यावरून येथे मुसलमानांच्या दोन गटांमध्ये मोठ्या प्रमाणात हाणामारी झाली. अजानच्या सूत्रावरून मशिदीबाहेर अल अदीस आणि शिया या मुसलमानांच्या दोन गटांमध्ये बराच वेळ भांडण चालू होते. यानंतर झालेल्या हाणामारीत अनेक जण घायाळ झाले. या मारहाणीचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित झाला आहे. (मुसलमान आणि दंगली असे समीकरणच झाले आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही ! – संपादक)
कर्णावती पोलिसांनी सांगितले की,
कर्णावतीमधील शाहपूर पोलीस ठाण्याच्या परिसरात अहमदिया मुसलमान आणि बिस्मिल्ला मशीद यांच्यामध्ये ‘अजान कुणी आधी द्यायची ?’, या सूत्रावरून हाणामारी झाली. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहे.