भाजप माजी खासदार प्रताप सिंह यांची चेतावणी

मैसूरु (कर्नाटक) – मैसूरुमध्ये मार्च २०१६ मध्ये भाजपचे कार्यकर्ते राजू यांची हत्या झाल्यानंतर तेथील मशीद बंद करण्यात आली होती. आता ती मशीद एवढ्या सहज उघडू देणार नाही, असा निर्धार भाजपचे नेते आणि माजी खासदार प्रताप सिंह यांनी पत्रकारांशी बोलतांना व्यक्त केला. याविषयी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना त्यांनी थेट आव्हान दिले आहे.

प्रताप सिंह पुढे म्हणाले की…,
१. सिद्धरामय्या यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या पूर्वीच्या कार्यकाळात दंगलीमध्ये सहभागी असलेल्या १ सहस्र ६०० धर्मांध मुसलमान गुंडांवर प्रविष्ट (दाखल) झालेल्या १७५ प्रकरणांचे अन्वेषण मुख्यमंत्री झाल्यानंतर तडकाफडकी बंद केले होते. ही सर्व प्रकरणे मागे घेऊन ते तालिबानसारखे सरकार चालवत आहेत.
२. कोडगूमध्ये कुट्टप्पा यांची हत्या (नोव्हेंबर २०१५), मैसूरुमध्ये राजू यांची हत्या (मार्च २०१६), बेंगळुरूमध्ये रुद्रेश यांची हत्या (ऑक्टोबर २०१६) इत्यादी हिंदुत्वनिष्ठांच्या हत्येच्या घटना घडल्या होत्या. राजा यांच्या हत्येनंतरच मैसूरुमधील ती वादग्रस्त मशीद बंद करण्यात आली होती. आता सिद्धरामय्या पुन्हा सत्तेत आल्यावर बंद असलेली ती मशीद उघडण्याचा प्रयत्न केला जात आहे.
३. या प्रकरणावर चर्चा करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक बोलवली आहे. निवासाच्या जागेवर मशीद बांधणे चुकीचे होते, असे सांगत प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावर जोरदार टीका केली. ‘तुम्हाला केवळ मुसलमानांच्या मतांचा विचार करायचा आहे का ? इतर लोकांची मते नकोत का ?’, असा प्रश्नही प्रताप सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना केला आहे.
लहान मुलांना सनातन धर्माची सोप्या भाषेत ओळख करून देणारे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रकाशित !
पुणे रेल्वेस्थानकातील अवैध विक्रेत्यांवर कारवाई !
Dhubri Beef Arrest : धुबरी (आसाम) : गोमांस बाळगणार्या ५ जणांना अटक : गोमांस जप्त
‘शिक्षक पात्रता परीक्षे’ची (‘टीईटी’ची) प्रश्नपत्रिका फुटल्याने परीक्षा रहित !
राज्यातील १ सहस्र १६४ शाळांमध्ये विद्यार्थिनींसाठी स्वच्छतागृहांचा अभाव !
Karnataka Minister Priyank Kharge : (म्हणे) ‘जगभरातील तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने पुढे जात असतांना सरकार ‘आयआयटी’ संस्थांना ज्योतिष, पुनर्जन्म आदींचे संशोधन करण्यास जुंपत आहे !’