Karnataka Muslim Reservation Bill : कर्नाटक : मुसलमानांना सरकारी कंत्राटामध्ये ४ टक्के आरक्षण देणारे विधेयक संमत

बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेस सरकारने सरकारी कंत्राटांमध्ये मुसलमानांना ४ टक्के आरक्षण देणारे विधेयक संमत केले. या विधेयकाला भाजपने तीव्र विरोध केला. तसेच या विधेयकाला कायदेशीररित्या आव्हान देण्याचा निर्णय घेतला.

भाजपच्या आमदारांनी विरोध करतांना सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. भाजपच्या काही आमदारांनी या विधेयकाची प्रत आणि काही कागदपत्रे थेट विधानसभेच्या अध्यक्षांवर भिरकावल्याचा आरोप काँग्रेसच्या आमदारांनी केला. यामुळे सभागृहात मोठा गदारोळ झाला. विधानसभेचे कामकाज काही वेळासाठी स्थगित करण्यात आले.

संपादकीय भूमिका

काँग्रेसचे सरकार म्हणजे मोगलांचे सरकार असल्याने याव्यतिरिक्त ते काय करणार ? अशांना निवडून देणारे हिंदू आत्मघात करत आले आहेत आणि पुढेही करत रहाणार आहेत. त्यामुळे ही स्थिती थांबवण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !