मुंबई – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची पुढील सुनावणी ४ मार्च या दिवशी होणार आहे. २५ फेब्रुवारी या दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत इतर मागासवर्गीय समाजाला किती आरक्षण असावे ? याविषयीची सुनावणी होणार होती; मात्र न्यायालयाने ही सुनावणी पुढे ढकलली आहे. आरक्षणावरील सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगर परिषदा, पंचायत समित्या आदींच्या निवडणुका रखडल्या आहेत.