जातीने नव्हे, तर गुणांनी व्यक्ती मोठी ठरते ! – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
कोणतीही व्यक्ती ही जात, पंथ, धर्म, भाषा आणि लिंग यांनी श्रेष्ठ, मोठी ठरत नाही. ती गुणांनी मोठी ठरते. गुण, कर्तव्यावर विश्वास ठेवून काम करणे महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले.