…तर परत टाळेबंदीला सामोरे जावे लागेल ! – पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची संभाजीनगरकरांना चेतावणी

शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले, तर रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागेल आणि वेळप्रसंगी दिवसाही संचारबंदी करावी लागेल’, अशी चेतावणी येथील पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

इतर प्रभागांत गेलेली नावे परत समाविष्ट न केल्यास आंदोलन करू ! – रविकिरण इंगवले, शिवसेना

शिवसेनेचा महापौर होऊ नये, म्हणून त्यांच्या हक्काचे ६०० ते १ सहस्र मतदार दुसर्‍या मतदारसंघात टाकायचे आणि या ठिकाणी विरोधकांचे मतदार घुसवायचे, असे षड्यंत्र चालू आहे.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे पालखी मार्ग होणार भक्तीमार्ग ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखी मार्गांचे काम पुढील दीड वर्षांत पूर्ण केले जाईल. यासाठी १२ सहस्र कोटी रुपयांची तरतूद !

हिंदुद्वेषी शरजील उस्मानी याला पुणे येथेच चोपायला हवे होते ! – राज ठाकरे यांचा संताप

सध्या राज्यात अशाच पद्धतीचे राजकारण चालू आहे. कुणाला तरी बोलायला लावायचे आणि त्यावर मग राजकारण करायचे, अशा शब्दांत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ६ फेब्रुवारी या दिवशी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला. 

कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचा महापौर करण्यास सज्ज ! – राजेश क्षीरसागर, कार्यकारी अध्यक्ष, राज्य नियोजन मंडळ

आता कोल्हापुरात शिवसेनेचा महापौर व्हावा, हे पक्षश्रेष्ठींचे स्वप्न साकार करण्यास कोल्हापूरची शिवसेना सज्ज झाली आहे.

(म्हणे) ‘अण्णा हजारे हे अविश्‍वासू !’- काँग्रेसचे नेते आणि माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर

अण्णा हजारे यांनी काय करावे आणि ते कसे आहेत, हे देशाची सर्वाधिक हानी करून देशाला रसातळाला नेणार्‍या काँग्रेसच्या नेत्यांनी सांगण्याची आवश्यकता नाही. अण्णा हजारे यांनी काय करावे आणि काय करू नये, याचे स्वातंत्र्य त्यांना नाही का ?

(म्हणे) ‘किसान मोर्चाच्या लोकांवर खोटे गुन्हे नोंद केले !’ – मेधा पाटकर यांचा आरोप

देहलीच्या रस्त्यावर बॅरिकेट तोडणे, ट्रॅक्टर गोल फिरवणे, दगडफेक आदी केलेले समाजविघातक प्रकार हे गुन्हे नोंद करण्यालायक नाहीत का ? संयुक्त किसान मोर्चात अन्य लोक सहभागी होते, तर त्यांना सहभागी न होऊ देणे हे मोर्चाचे दायित्व नव्हते का ?

भारत आणि पाक यांच्यात सैनिकी संघर्ष झाल्यास संपूर्ण जगासाठी विनाशकारी  ! – संयुक्त राष्ट्रे

असा संघर्ष झाल्याविना भारताला आणि जगाला शांतता लाभणार नाही, हीसुद्धा वस्तूस्थिती आहे !

अण्णा हजारे यांनी उपोषण मागे घेतले !

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे ३० जानेवारी, म्हणजेच उद्यापासून शेतकर्‍यांच्या विविध मागण्यांसाठी उपोषणाला बसणार होते.

(म्हणे) ‘श्रीक्षेत्र माहूर येथील रेणुकादेवी मंदिरात महिला पुजारी नेमावा !’ – तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड

धर्मांधांकडून लव्ह जिहादच्या माध्यमातून हिंदु मुलींवर होणारे अत्याचार, महिलांवरील बलात्कार आदी दूर करण्यासाठी यांनी कधी आवाज उठवला आहे का ? यावरून स्त्रीमुक्ती, महिला सक्षमीकरण आदी मागण्या किती पोकळ आहेत, हेच दिसून येते !