
फरिदाबाद (हरियाणा) – अयोध्येत श्री रामलल्लाच्या (श्रीरामाचे बालक रूप) प्राणप्रतिष्ठेला एक वर्ष पूर्ण झाले. त्या निमित्ताने हरियाणातील फरिदाबाद आणि धारुहेरा (रेवाडी) येथे विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थितांना प्रभु श्रीरामाविषयी माहिती देण्यात आली. त्यानंतर श्रीराम आणि हनुमान यांची महाआरती, श्रीरामरक्षास्तोत्र अन् हनुमान चालीसा यांचे पठण, तसेच श्रीरामाचा सामूहिक जप करण्यात आला. सनातन संस्थेच्या सरोज गुप्ता आणि सौ. स्वाती सातपुते यांनी कार्यक्रम आयोजित करण्यामागील उद्देश सांगितला. फरिदाबाद येथील कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. दिनेश बंसल उपस्थित होते. या वेळी श्री. बंसल यांनी ‘श्रीरामापेक्षा त्याचे नाव श्रेष्ठ असून ते वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पातळीवर कसे कार्य करते’, याची माहिती सांगितली.
क्षणचित्रे
१. बालसंस्कारवर्गातील मुलांनी उत्स्फूर्तपणे प्रभु श्रीराम आणि सीता-राम लिहून रांगोळी काढली. यासह प्रभु श्रीरामाच्या पूजेच्या सिद्धतेत बालसाधकांनीही सहभाग घेतला.
२. ‘वेस्टॅक सोसायटी’ मंदिराच्या प्रमुख सौ. सरला यादव यांनी उपिस्थतांसाठी अल्पोपहार, चहा आणि प्रसाद यांची व्यवस्था केली.
प्रेमळ आणि इतरांना निरपेक्षतेने साहाय्य करणारे फोंडा (गोवा) येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. आत्माराम जोशी (वय ८० वर्षे) !
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
सनातन संस्थेच्या वतीने मथुरा येथे ५ दिवसांचा ‘सनातन संस्कार प्रशिक्षण वर्ग’ पार पडला !