…तर परत टाळेबंदीला सामोरे जावे लागेल ! – पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांची संभाजीनगरकरांना चेतावणी

संभाजीनगर – ‘शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत राहिले, तर रात्रीच्या संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागेल आणि वेळप्रसंगी दिवसाही संचारबंदी करावी लागेल’, अशी चेतावणी येथील पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी १८ फेब्रुवारी या दिवशी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. वेळीच सावध व्हा…नियम पाळा, अन्यथा परत टाळेबंदीला सामोरे जावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

महापालिकेचे आयुक्त अस्तिककुमार पांड्ये म्हणाले की, कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता महानगरपालिकेच्या हद्दीतील शाळांमध्ये पाचवी ते बारावी या वर्गात, दहावी आणि बारावी वगळता इतर वर्गांतील विद्यार्थ्यांना शाळेत येणे बंधनकारक रहाणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना शाळेत जायचे असेल, त्यांनी शाळेला तसे आवेदन करून ते शाळेत जाऊ शकतात, अन्यथा विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे ‘ऑनलाईन’ शिकवणीद्वारे अभ्यास करावा लागणार आहे. हा निर्णय २८ फेब्रुवारीपर्यंत लागू राहील. त्यानंतर परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेतला जाईल. १९० मंगल कार्यालयांना महानगरपालिकेच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. शिकवणीवर्ग आणि शाळा यांवरही लक्ष ठेवण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली.