शिंदे यांच्यावर टीका करतांना संजय राऊतांकडून नागा साधूंचा अवमान

मुंबई – एकनाथ शिंदे म्हणजे अस्वस्थ आत्मा आहे. त्यांनी कुंभमेळ्यात नागा साधूंसमवेत जाऊन बसायला हवे होते. नागा साधू हेही अस्वस्थ असतात. ते अघोरी विद्या करतात. जे महाराष्ट्रात अस्वस्थ आहेत, त्यांनी तिकडे जावे. तिथे योगींनी त्यांच्यासाठी व्यवस्था केली आहे. तुमची राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या मुळावर येत आहे, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केले. ते नेहमीप्रमाणे प्रसिद्धीमाध्यमांशी बोलत होते. अशा प्रकारे एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करतांना राऊत यांनी नागू साधूंविषयी बोलून त्यांचा अवमान केला आणि त्यांच्या तपसाधनेची खिल्ली उडवली आहे.

संपादकीय भूमिका

धर्मातील उदाहरणे देण्याची सवय लागल्याने हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातील, याचे भानही नेत्यांना रहात नाही !