सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ‘पसार’ कृष्णा आंधळे ‘वॉन्टेड’ घोषित !

डावीकडून संतोष देशमुख आणि कृष्णा आंधळे

बीड – मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एकमेव ‘पसार’ आरोपी कृष्णा आंधळे याला बीड पोलिसांनी ‘वॉन्टेड’ म्हणून घोषित केले आहे. पोलिसांनी त्याची माहिती देणार्‍यास योग्य ते पारितोषिक देण्याची घोषणा केली आहे.

दुसरीकडे खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडीतील आरोपी वाल्मिक कराड याला सर्दी आणि ताप असून त्याला झोप येत नसल्याने त्याला ‘सीपीएपी मशीन’ (कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर मशीन) वापरण्यास न्यायालयाने अनुमती दिली आहे. हे यंत्र म्हणजे वैद्यकीय उपकरण असून जे मास्कद्वारे दाबयुक्त हवेचा स्थिर प्रवाह करून रुग्ण झोपल्यावर त्याचा श्वसनमार्ग खुला ठेवते. हवेतील धूळ, धूर असे घटक काढून टाकण्यासाठी त्यात एक ‘फिल्टर’ बसवलेला असतो.

वाल्मिक कराडची न्यायालयीन कोठडीत रवानगी ! 

बीड – खंडणी प्रकरणातील पोलीस कोठडीतील आरोपी वाल्मिक कराड याची राज्य गुन्हा अन्वेषण शाखेची कोठडी २२ जानेवारीला संपली. त्याला न्यायालयात उपस्थित केले असता त्याची रवानगी आता न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.