कोरेगाव पार्क येथील खासगी आस्थापनातील रोखपालाकडून २ कोटींचा अपहार

प्रतिकात्मक छायाचित्र

पुणे – कोरेगाव पार्क येथील एका खासगी आस्थापनातील रोखपालाने २ कोटी रुपयांचा अपहार केला. या प्रकरणी आस्थापनाचे मालक जिनेंद्र दोशी यांनी दिलेल्या तक्रारीवरून रोखपालाविरुद्ध कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दोशी यांचे जेनसिस इव्हेंट मॅनेजमेंट आस्थापन असून तिचे कार्यालय कोरेगाव पार्क भागात आहे. रोखपालाने दोशी आणि त्यांच्या भागीदारांना विश्वासात घेऊन आस्थापनातील सर्व आर्थिक व्यवहार कह्यात घेतले, तसेच कर भरण्याविषयीच्या बनावट नोंदी करून २ कोटी रुपयांचा अपहार केला. संबंधित रक्कम रोखपालाने स्वतःच्या बँक खात्यात, तसेच नातेवाईकांच्या खात्यात हस्तांतरित केली. लेखापरीक्षणात हा प्रकार उघडकीस आल्यानंतर दोशी यांनी तक्रार दिली.