|

चिपळूण, २२ जानेवारी (वार्ता.) – येथील कुंभार्ली घाटमाथ्यावर कराडच्या दिशेने गोवंश घेऊन जाणार्या एका ट्रकाविषयी हिंदुत्वनिष्ठ आणि गोरक्षक यांना माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या साहाय्याने या ट्रकावर कारवाई करण्यात आली. या ट्रकामध्ये २२ गोवंश (बैल) असून त्यांना कराड येथे नेण्यात येत होते. या ट्रकचा मालक बागवान हा कराड येथील आहे. या प्रकरणी अलोरे-शिरगाव पोलीस ठाण्यात गुरांच्या बेकायदा वाहतुकीप्रकरणी इकबाल खेरटकर आणि ट्रकचालक नलावडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला असून त्यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे.
या प्रकरणी खेर्डी (चिपळूण) येथील भाजप जिल्हा सरचिटणीस श्री. विनोद भुरण, युवा सेनेचे तालुकाप्रमुख श्री. निहार कोवळे, गोरक्षक श्री. श्रीधर भुरण आणि श्री. विक्रम जोशी यांच्या सतर्कतेमुळे ही कारवाई होऊन गोवंश वाचवण्यासाठी प्रयत्न झाले. त्यांना गोवंश तस्करीची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर गोवंशियांची वाहतूक करणारा ट्रक कुंभार्ली घाटात आला असतांना तेथील पोलिसांनी ट्रकला थांबवले. तोपर्यंत भाजपचे पदाधिकारी विनोद भुरण आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ तेथे पोचले होते. या सर्वांच्या समोर या ट्रकची तपासणी केली असता ट्रकमध्ये २२ गोवंशीय कोंबलेले आढळून आले, यामध्ये यामध्ये ३ गोवंश घायाळ झाले होते.
संपादकीय भूमिकागोवंशियांच्या तस्करीची जी माहिती हिंदुत्वनिष्ठांना मिळते; ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना का मिळत नाही ? |
छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देत विद्यार्थिनीवर अत्याचार करणार्या शिक्षकाला अटक !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
मांगेली परिसरात पहिल्याच पावसात उच्च दाबाच्या वीजवाहिनीचे खांब वाकले
मेटावाडा, कुळे येथे दूधसागर नदीत बुडून ४ जणांचा मृत्यू
अवैधरित्या खतांची निर्मिती आणि विक्री करणारे यांच्यावर गुन्हा नोंद