गोमातेच्या रक्षणार्थ २५ रोजी चिपळूणमध्ये ‘गर्जना सभा’

शिवसेनेचे आमदार नीलेश राणे

चिपळूण – शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी येथे घडलेल्या गोवंशियांच्या तस्करी प्रकरणात लक्ष घातले आहे. या अनुषंगाने २५ जानेवारीला चिपळूणमध्ये गोमातेच्या रक्षणार्थ ‘गर्जना सभा’ आयोजित करण्यात आली आहे.

याविषयी शिवसेनेचे आमदार नीलेश राणे यांनी म्हटले आहे की, कुंभार्ली घाटात उघडकीस आलेल्या गुरांच्या वाहतुकीप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी येथील उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. २५ जानेवारी सायंकाळी ५ वाजता चिपळूणमध्ये गोमातेच्या रक्षणार्थ सभा आयोजित करण्यात आली असून चिपळूणवासियांनी मोठ्या संख्येने या सभेला उपस्थित रहावे. येत्या अधिवेशनात ‘गोवंश तस्करीप्रकरणी कडक कायदा करण्यात यावा, तसेच या तस्करी प्रकरणात जे जे सहभागी आहेत, त्यांच्यावर मोक्का लावण्यात यावा’, अशी मागणी आम्ही करणार आहोत.