शुक्रवारच्या नमाजपठणासाठी विधानसभेचे कामकाज थांबवण्याची मुसलमान आमदारांची मागणी विधानसभा अध्यक्षांनी नाकारली !  

विधानसभा जनतेच्या कामासाठी असते. अशा मागणीसाठी गोंधळ घालून सभागृहाचा वेळ वाया घालवणार्‍यांकडून सरकारने त्याचा खर्च वसूल केला पाहिजे !

हिंदुद्वेषी ‘अल्-जजीरा’ !

भारत सरकारने ‘अल्-जजीरा’ची काळी बाजू वेळीच लक्षात घेऊन तिच्यावर कायमस्वरूपी बंदी घालायला हवी. इस्लामी महत्त्वाकांक्षेच्या बळावर भारताची अपकीर्ती करणार्‍या ‘अल्-जजीरा’ला रोखठोक प्रत्युत्तर दिले तरच अन्य विदेशी प्रसारमाध्यमांकडून केल्या जाणार्‍या भारतविरोधी वृत्तांकनाला आळा बसेल !

(म्हणे) ‘भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा !’

के. चंद्रशेखर राव यांचा तेलंगाणा राष्ट्र समिती हा पक्ष मुसलमानांचे लांगूलचालन करण्यात धन्यता मानतो आणि हिंदूंना नेहमीच दुय्यम स्थान देतो. अशांना भगवा ध्वज खुपल्यास आश्‍चर्य ते काय ?

मुंबई पालिकेत शेवटच्या दिवशी विनाचर्चा ६ सहस्र कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत

मुंबई महापालिकेची ७ मार्च या दिवशी मुदत संपतांना शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत विनाचर्चा ६ सहस्र कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत करण्यात आल्याने  भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ केला.

नवाब मलिक यांच्यावरील देशद्रोहाच्या आरोपांचा विरोधकांकडून विधान परिषदेत पुनरोच्चार !

नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकर हिच्याशी आर्थिक व्यवहार केले आहेत. हा थेट दाऊद याच्याशी संबंध आहे. नवाब मलिक कारागृहातून मंत्रीपदाचे कामकाज पहाणार आहेत का ? त्यामुळे मलिक यांनी त्यागपत्र द्यावे.

पुतिन यांच्या विरोधात रशियातील ५१ शहरांत आंदोलन : १ सहस्र ४०० आंदोलकांना अटक !

युक्रेनवरील आक्रमणाच्या निषेधार्थ रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांच्या विरोधात रशियातील ५१ शहरांमध्ये आंदोलन करण्यात आली. पोलिसांनी हे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न करत १ सहस्र ४०० आंदोलकांना कह्यात घेतले.

(म्हणे) ‘तमिळनाडूमध्ये भाजपला रोखायचे असल्यास लोकांचे धर्मांतर आवश्यक !’

तमिळनाडूमध्ये भाजपचा वाढता प्रभावामुळे हिंदुद्वेष्ट्यांना पोटशूळ उठल्यामुळे सामाजिक माध्यमांवर भाजपला रोखण्यासाठी अशा प्रकारे हिंदुविरोधी चर्चांना उधाण आले आहे.

अंतिम प्रभाग रचनेत योग्य पालट न केल्यास न्यायालयात जाणार ! – गणेश नाईक, आमदार

नियमानुसार नाला, मोठे पूल, मोठे रस्ते या सीमा घेण्याऐवजी छोट्या गल्ल्या यांची सीमारेषा ठरवली आहे. इमारतींचे, घरांचे, वस्त्यांचे विनाकारण विभाजन करण्यात आले आहे.

शिवजयंती साजरी करू न देणार्‍या डोंबिवली येथील महाविद्यालयाच्या प्रशासनाच्या विरोधात विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांची निदर्शने

पेंढारकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना महाविद्यालयात शिवजयंती साजरी करण्यास दिली नाही. त्यामुळे निषेध करत विहिंप आणि बजरंग दल यांनी निदर्शने केली.

एफ्.ए.टी.एफ्. : भारत आणि भारतीय !

राष्ट्राच्या संदर्भात निर्णय घेतांना ‘जग काय म्हणेल?’, असा विचार केला जात नाही. अमेरिका, रशिया, इस्रायल यांसारखे देश असा विचार करतांना कधीच दिसत नाहीत. ते ‘राष्ट्र सर्वाेपरि’ असाच विचार करून निर्णय घेतात आणि कृतीही करतात. इतकेच नव्हे, तर जागतिक व्यासपिठावर स्वतःची शक्ती दाखवून देतात. भारत स्वतःच्या संदर्भातही असा वागत नाही, हे अपेक्षित नाही.