एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी शिवसेनेच्या आमदारांची मागणी !

एकनाथ शिंदे

मुंबई – एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत, यासाठी त्यांच्या पत्नी सौ. लता शिंदे यांनी २६ नोव्हेंबर या दिवशी नाशिक मधील त्र्यंबकेश्वर येथे दर्शन घेऊन शिवपिंडीला दुग्धाभिषेक केला. शिवसेनेच्या आमदारांनी प्रसारमाध्यमांवर, तसेच सामाजिक माध्यमांवरून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करावे, अशी मागणी लावून धरली आहे. याविषयी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २५ नोव्हेंबरच्या रात्री १२.५३ वाजता ‘एक्स’ खात्यावरून ‘माझ्या समर्थनार्थ वर्षा  निवासस्थानी किंवा अन्य कुठे एकत्र जमू नये. समर्थ आणि समृद्ध महाराष्ट्रासाठी महायुती भक्कम होती आणि यापुढेही राहील’, असा संदेश प्रसारित केला आहे.