दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये दगडफेकीचे वृत्त प्रसिद्ध झाल्याचा परिणाम !
जळगाव – यावल शहरात भाजपच्या विजय मिरवणुकीवर मुसलमानांनी दगडफेक केली होती. यासंदर्भातील वृत्त दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झाल्यावर २५ नोव्हेंबर या दिवशी यावल पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक घेण्यात आली.
तक्रार देण्यास हिंदूंवरच दबाव !
पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी प्रदीप ठाकूर यांनी काही पोलीस कर्मचार्यांना दगड लागलेले असल्यावरही स्वतः फिर्यादी न होता हिंदूंनाच फिर्यादी होण्यास सांगितले. ‘हिंदूंनी तक्रार दिली, तर मुसलमानही देतील आणि मग दोघांवरही गुन्हे नोंदवले जातील’, असेही ते म्हणाले. (प्रत्येक वेळी हिंदूंचीच गळचेपी करणारे पोलीस ! – संपादक)
दगडफेकीच्या प्रकरणाच्या कारवाईविषयी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने पोलीस उपअधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांना संपर्क केला असता त्यांनी ‘या प्रकरणातील कारवाईची माहिती घेऊन कळवते’, असे त्यांनी सांगितले.
दगडफेकीत काही पोलीसही घायाळ झाले आहेत; पण तेही शांतच आहेत. (घायाळ झालेल्या पोलिसांनी तरी या प्रकरणी तक्रार प्रविष्ट करायला हवी होती; पण पोलीसच आवाज उठवण्यात टाळाटाळ करत असतील, तर पोलीस नेहमीच असे मार खाणार ! संपादक) |
संपादकीय भूमिका
|