भाजपकडून गदारोळ !

मुंबई – मुंबई महापालिकेची ७ मार्च या दिवशी मुदत संपतांना शेवटच्या स्थायी समितीच्या बैठकीत विनाचर्चा ६ सहस्र कोटी रुपयांचे प्रस्ताव संमत करण्यात आल्याने भाजपच्या नगरसेवकांनी गदारोळ केला. भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्त कार्यालयाबाहेर घोषणा दिल्या. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्याविरोधातही या वेळी घोषणा दिल्या.
मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्चला संपणार आहे. त्यानंतर पालिकेचा कारभार ८ मार्चपासून प्रशासकाच्या माध्यमातून चालू रहाणार आहे. मुंबई महापालिकेची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच महापालिकेवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात येणार आहे.
शासकीय प्रयोगशाळांमध्ये विषशोधक यंत्रणेचा अभाव !
प्रार्थना किंवा मंत्र म्हणण्यासाठी विद्यार्थी किंवा त्यांचे पालक यांची संमती आवश्यक ! – IRS Nisha Oraon
हिंदूंनी ‘कॉर्पोरेट जिहाद’ प्रकरणातून शत्रूबोध घ्यावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
कल्याण येथे नालेसफाईसाठी बालकामगाराचा वापर; ठेकेदाराविरुद्ध गुन्हा नोंद
सातारा येथे व्यावसायिक लाभासाठी महामार्गावरील रस्ते दुभाजक फोडले
महामार्गांवरील फलकांवर ‘अहिल्यानगर’ आणि ‘छत्रपती संभाजीनगर’ नावे त्वरित लावावीत !