मेरठ (उत्तरप्रदेश) : मुसलमानांनी धारदार शस्त्रांनी केले हिंदु कुटुंबावर आक्रमण !

मुसलमान तरुणाने हिंदु तरुणीचा विनयभंग केल्यावरून हिंदूंनी केला होता विरोध !

प्रतिकात्मक छायाचित्र

मेरठ (उत्तरप्रदेश) – येथे नुकतेच एका हिंदु तरुणीची मुसलमान तरुणाने छेड काढल्याने हिंदू आणि मुसलमान यांच्यात संघर्ष झाला. या वेळी धर्मांध मुसलमानांनी गोळीबार आणि धारदार शस्त्रे यांचा वापर करत हिंदूंवर आक्रमण केले. या वेळी दगडफेकही करण्यात आली. यामध्ये  एकूण १२ जण घायाळ झाले. घटनास्थळी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून उर्वरित आरोपींचा शोध चालू आहे.

१. पीडित हिंदु तरुणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, मुसलमान समाजातील काही लोकांनी तिचा विनयभंग चालू केला. पीडितेने विरोध केल्यावर आरोपी मुसलमान तरुणाने तिचा चेहरा दाबला आणि तिला जंगलाच्या दिशेने घेऊन जाऊ लागला. पीडितेने आरोपीच्या तावडीतून स्वत:ची सुटका करून घेतली आणि घरी पोचून सर्व माहिती कुटुंबियांना दिली.

२. या प्रकरणी गावात पंचायत बोलावण्यात आली. पंचायतीने आरोपीला क्षमायाचना करायला लावून हे प्रकरण मिटवले; मात्र काही वेळाने मुसलमान जमावाने हातात काठ्या, धारदार शस्त्रे आणि अवैध पिस्तुले यांसह पीडित मुलीच्या कुटुंबियांवर आक्रमण केले.

३. मुसलमान जमावाने पीडितेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना अमानुष मारहाण केली. कुटुंबाचा आरडाओरडा आणि आवाज ऐकून हिंदु समुदायातील काही लोक तेथे जमा झाले. काही वेळातच दोन्ही बाजूंनी दगडफेक चालू झाली.

४. पीडितेच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. अन्य काही आरोपी पसार असून त्यांच्या शोधासाठी धाडी घालण्यात येत आहेत. या प्रकरणातील आरोपींवर कडक कारवाई करण्याची मागणी हिंदु संघटनांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

बहुसंख्यांक हिंदूंच्या देशात, हिंदुत्वनिष्ठ शासन सत्तेत असलेल्या राज्यात मुसलमान हिंदूंवर सातत्याने आक्रमणे करतात, ही स्थिती हिंदू, तसेच प्रशासन यांच्यासाठी लज्जास्पद !