कार्डवर असणार ‘क्यू.आर्. कोड’ !
(‘क्यू.आर्. कोड’ म्हणजे ‘क्विक रिस्पॉन्स कोड’. बारकोड प्रमाणे असलेली एक प्रकारची सांकेतिक भाषा)
नवी देहली – केंद्र सरकारने पॅनकार्डच्या संदर्भात पालट करण्याच्या प्रकल्पाला संमती दिली आहे. यावर केंद्र सरकारने १ सहस्र ४३५ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. यामुळे आता सर्व नागरिकांना सुधारित पॅनकार्ड मिळणार आहे. या कार्डमध्ये आता ‘क्यू.आर्. कोड’ असणार आहे. हे सुधारित कार्ड विनामूल्य आणि थेट देण्यात येणार आहे. या कार्डमुळे करदात्यांना अनेक सेवा सोप्या पद्धतीने मिळणार आहेत.