दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुणे न्यायालयाकडून समन्स !

कॉपीराईटचे उल्लंघन केल्याचे प्रकरण !

दिग्दर्शक नागराज मंजुळे

(कॉपीराईट म्हणजे स्वामीत्व हक्क)

पुणे – मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांना पुणे न्यायालयाने समन्स पाठवले आहे. नागराज यांच्या ‘खाशाबा’ चित्रपटाची कथा वादात सापडली आहे. या चित्रपटाची मूळ कथा ही लेखक संजय दुधाणे यांची असल्याचे समोर आले आहे. याच संदर्भात दुधाणे यांनी नागराज मंजुळे, तसेच ‘जिओ स्टुडिओ’, ‘आटपाट प्रॉडक्शन’ आणि ज्योती देशपांडे यांच्या विरोधात पुणे जिल्हा अन् सत्र न्यायालयात खटला प्रविष्ट केला आहे. याच प्रकरणी कॉपीराईटचे उल्लंघन केल्याने न्यायालयाने नागराज यांना समन्स पाठवले आहे. त्यामुळे चित्रपट प्रदर्शित व्हायच्या आधीच वादात अडकला आहे.