भाग्यनगर (तेलंगाणा) – हिंदु मंदिरांचे संरक्षण करावे, तसेच त्यांना चर्च आणि मशिदी यांच्याप्रमाणेच सुविधा द्याव्यात, धर्मादाय कायदा रहित करावा आणि हिंदूंना त्यांच्या मंदिरांचे व्यवस्थापन करण्याची अनुमती द्यावी, अशी मागणी ‘ग्लोबल हिंदु हेरिटेज फाऊंडेशन’च्या मंचावरून विविध हिंदुत्वनिष्ठांनी केली. या संघटनेच्या वतीने भाग्यनगरमधील सोमाजीगुडा येथील पत्रकार कक्षात ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. ‘सनातन धर्माचे जतन, संवर्धन आणि संरक्षण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत’, असे अनेक हिंदुत्वनिष्ठांनी या वेळी सांगितलेे.
१. आंध्रप्रदेशाचे माजी मुख्य सचिव श्री. एल्. व्ही. सुब्रह्मण्यम् यांनी हिंदु मंदिरांचे व्यवस्थापन करण्याच्या सरकारच्या क्षमतेविषयी शंका व्यक्त केली. अनेक धर्मनिरपेक्षतावादी, नास्तिक आणि अश्रद्धाळू लोक, ज्यांना हिंदु धर्माची मूलभूत तत्त्वे ठाऊक नाहीत, ते मंदिर व्यवस्थापनाशी निगडित सरकारी पदांवर आहेत. जर हिंदंची मंदिरे अशा प्रकारचे लोक चालवत असतील, तर या मंदिरांचे भविष्य काय असेल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.
२. ‘सी.बी.आय.’चे माजी महासंचालक एम्. नागेश्वर राव म्हणाले, ‘‘मी ‘सनातन धर्मरक्षण मंडळ’ या संकल्पनेला विरोध केला; कारण हे मंडळ कसे कार्य करेल आणि कसे आकार घेऊ शकते, हे सांगता येत नाही.’’
३. भगवद़्गीता संस्थेचे संस्थापक श्री. एल्.व्ही. गंगाधर शास्त्री यांनी भगवद़्गीतेला राष्ट्रीय ग्रंथ मानण्याची मागणी केली.
४. वैदिक विद्वान श्री. रेमेल्ला अवधानुलु यांनी हिंदु धर्माच्या संवर्धनाचे महत्त्व विशद केले.
५. हिंदु समाजाला भेडसावणार्या व्यावहारिक समस्या आणि आपल्या मंदिरांच्या संवर्धनासाठी हिंदूंनी कसे प्रेरित व्हायला हवे, याविषयी पंकज श्रीनिवासन् यांनी भाष्य केले.
६. प्रकाशराव वेलागपुडी यांनी नमूद केले की, त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री, धर्मादाय मंत्री, तिरुपती तिरुमला विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष, कार्यकारी अधिकारी आणि इतर यांना अनेक पत्रे लिहून काही हिंदुविरोधी निर्णयांवर आणि अहिंदूंचे देवस्थान मंडळांवर असलेले वर्चस्व यांविषयी संताप व्यक्त केला आहे.
संपादकीय भूमिकाअशी मागणी हिंदूंकडून गेली कित्येक वर्षे होत आहे. आता तरी सरकारने याची नोंद घेऊन मंदिर सरकारीकरणाचा कायदा रहित करावा, असेच हिंदूंना वाटते ! |