हिंदु धर्माला केलेला विरोध सहन करणार नाही ! – भाजपचे खासदार यदुवीर वडेयर

भाजपचे खासदार यदुवीर कृष्‍णदत्त वडेयर

मंड्या (कर्नाटक) – सध्‍या हिंदुत्‍वाविषयी चुकीचा प्रचार वाढला आहे. हिंदुत्‍व सर्वांनी समजून घेतले पाहिजे. आम्‍हाला विरोध झाला, तरी आम्‍ही सहन करू; पण आमच्‍या धर्माला कुणी विरोध केला, तर आम्‍ही ते सहन करणार नाही, अशी चेतावणी भाजपचे खासदार यदुवीर कृष्‍णदत्त वडेयर यांनी दिली. मंड्या तालुक्‍यातील तग्‍गहळ्ळी गावातील मंदिराच्‍या परिसरात आयोजित केलेल्‍या भाजपच्‍या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘शेतकर्‍यांची भूमी वक्‍फ बोर्ड घशात घालत आहे. त्‍याविरोधात आम्‍ही लढा देऊ’, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.