Waqf Act Copies Torn : जम्मू-काश्मीर विधानसभेत सत्ताधारी पक्षाच्या आमदाराकडून फाडण्यात आली वक्फ सुधारणा कायद्याची प्रत

श्रीनगर (जम्मू-काश्मीर) – जम्मू-काश्मीर विधानसभेत वक्फ सुधारणा कायद्यावरून गदारोळ झाला. नॅशनल कॉन्फरन्सच्या आमदाराने सभागृहात कायद्याची प्रत फाडली. इतर पक्षांनी वक्फ कायद्याविरुद्ध ठराव आणण्यावर चर्चा केली होती. या गदारोळामुळे सभागृहाचे कामकाज स्थगित करण्यात आले.

दुसरीकडे सर्वाेच्च न्यायालयात वक्फ सुधारणा कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणार्‍या याचिकांवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाने सहमती दर्शवली. आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयात ६ याचिका प्रविष्ट (दाखल) झाल्या आहेत. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने ११ एप्रिलपासून देशभरात निदर्शने करण्याची घोषणा केली आहे.

संपादकीय भूमिका

कायद्याची प्रत फाडल्याने कायदा रहित होत नसतो, हेही ठाऊक नसणार्‍या लोकांना जनता निवडून देते, हे जनतेला लज्जास्पद !