Anti-Waqf Act Protests In Tripura : त्रिपुरामध्ये वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करतांना धर्मांध मुसलमानांचे पोलिसांवर आक्रमण

काँग्रेसचा नेता करत होता आंदोलनाचे नेतृत्व

उनाकोटी (त्रिपुरा) – येथील कैलाश महामार्गावर १२ एप्रिल या दिवशी वक्फ सुधारणा कायद्याच्या विरोधात आंदोलन करतांना धर्मांध मुसलमानांनी पोलिसांवर आक्रमण केले. यात पोलीस शिपाई आणि अधिकारी घायाळ झाले. पोलिसांनी हिंसाचार करणार्‍या ७ मुसलमानांना अटक केली आहे.

आंदोलक मुसलमानांना तिलबाजार ते उपविभागीय अधिकारी यांच्या जुन्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढायचा होता, त्याला पोलिसांनी रोखल्याने आक्रमण करण्यात आले. या वेळी पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला. या आंदोलनाचे नेतृत्व काँग्रेसचे नेते बद्रुज जमान करत होते.

संपादकीय भूमिका

  • लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार असतांना त्याचा दुरुपयोग करत हिंसाचार करणार्‍या मुसलमानांना आता देशात कुठेही आंदोलन करण्याची अनुमती देऊ नये, अशी मागणी राष्ट्रप्रेमी नागरिकांनी केली पाहिजे !
  • गांधींच्या कथित अहिंसावादाचे समर्थन करणार्‍या काँग्रेसवाल्यांचे हिंसक स्वरूप आता उघड होत आहे !